25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयईडीविरोधात कॉंग्रेसचे मंगळवारी आंदोलन

ईडीविरोधात कॉंग्रेसचे मंगळवारी आंदोलन

एकमत ऑनलाईन

सोनिया गांधींच्या ईडी चौकशीला विरोध, कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर उतरणार
नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशीसाठी ईडीने २६ जुलै रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना समन्स बजावले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या चौकशीदरम्यान काँग्रेसकडून पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येणार आहे. मंगळवारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून ईडीच्या सुडात्मक कारवाईला विरोध करतील, असे सांगण्यात आले.

गेल्यावेळेप्रमाणेच काँग्रेस खासदार संसद भवनात निदर्शने करून पक्ष मुख्यालयात येतील आणि ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करतील. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणातील चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने सोनिया गांधी यांना नवीन समन्स पाठवले होते. त्यानुसार त्यांना २५ जुलैऐवजी २६ जुलैला हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

यापूर्वी गुरुवारी ईडीने सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. ही चौकशी सुमारे ३ तास चालली. त्या दिवशीही काँग्रेसकडून जोरदार निदर्शने झाली. काँग्रेसने ईडीच्या या कारवाईला राजकीय सूडभावना असल्याचे म्हटले आणि त्याचा तीव्र निषेध केला. या चौकशीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले.

शांततापूर्ण सत्याग्रह
करणार : काँग्रेस
काँग्रेस पक्षाने सर्व कार्यकर्त्यांना २६ जुलै रोजी शांततापूर्ण सत्याग्रह आयोजित करण्यास सांगितले आहे. सर्व खासदार, एआयसीसी सरचिटणीस आणि सीडब्ल्यूसी सदस्यांना दिल्लीत होणा-या सत्याग्रहात सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणी ईडीने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचीही चौकशी केली होती. त्यादरम्यानही काँग्रेसने रस्त्यावर उतरून निदर्शने केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या