17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयईडी संचालक मिश्रांचा कार्यकाल पुन्हा वाढवला

ईडी संचालक मिश्रांचा कार्यकाल पुन्हा वाढवला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयचे (ईडी) संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाल शुक्रवारी आणखी एक वर्षाने वाढवण्यात आला. त्यामुळं मिश्रा आता १८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत या पदावर कार्यरत राहतील. त्यांना सलग तिस-यांदा ही मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात त्यांचा कार्यकाल संपत होता.

मिश्रा यांना १९ नोव्हेंबर २०१८ ला दोन वर्षांच्या कालावधीसाठी संचालक म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. त्यानंतर, १३ नोव्हेंबर २०२० च्या आदेशानुसार सरकारने नियुक्ती पत्रात सुधारणा करून त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल तीन वर्षांवर आणला होता. सरकारने गेल्या वर्षी अध्यादेश आणत ईडी आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) च्या संचालकांचा कार्यकाळ वाढवण्याची परवानगी दिली होती.

या अध्यादेशानंतर गेल्यावर्षी १७ नोव्हेंबरला ईडी प्रमुखांचा कार्यकाल वाढवला होता. आता पुन्हा त्यामध्ये एक वर्षाची वाढ करण्यात आली.

मिश्रा हे १९८४ बॅचचे अधिकारी
मिश्रा हे १९८४ बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी आहेत. त्यांची १९ नोव्हेंबर २०१८ ला संचालक म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. ईडी संचालक म्हणून त्यांचे हे पाचवे वर्ष असणार आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांचा कार्यकाळ वाढवण्यास मंजुरी दिली आहे. ईडी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.

सर्वोच्च न्यायालयात आव्हान
सार्वजनिक हिताच्या दृष्टीने संवेदनशील प्रकरणांमध्ये तपासात सातत्य ठेवण्यासाठी इडीच्या प्रमुखाचा कार्यकाळ दोन वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत वाढवल्याचे शपथपत्र केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या