26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeमहाराष्ट्र‘भारतीय संविधानाची ओळख’ विषय विद्यापीठांमध्ये अनिवार्य

‘भारतीय संविधानाची ओळख’ विषय विद्यापीठांमध्ये अनिवार्य

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गुरुवारी राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान, त्यांच्या कार्याची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘भारतीय संविधानाची ओळख’ हा विषय सर्व विद्यापीठांतील सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वसहमतीने घेण्यात आला, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य आणि त्यांचे संविधान निर्मितीमधील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या या कार्याची माहिती पुढील पिढीला होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘भारतीय संविधानाची ओळख’ हा विषय सर्व विद्यापीठांतील सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भावी पिढीला संविधानातील मूल्यांची ओळख होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक नागरिकापर्यंत संविधान पोहोचणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकर यांचे आचार, विचार जनमानसात रुजवण्यासाठी संविधान प्रत वितरित करण्याचा कार्यक्रम शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभर राबवण्यात येणार आहे.

डॉ. आंबेडकर यांनी घटना परिषदेच्या माध्यमातून अथक परिश्रमातून भारतीय राज्यघटना साकारली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना देशाला अर्पण करण्यात आली. न्याय्य हक्क, संवैधानिक अधिकार, आणि कर्तव्य याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांना होण्यासाठी भारताचे संविधान त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संविधानाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, म्हणून हा विषय सर्व विद्याशाखांत अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या