27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमराठवाडाउजनी, जायकवाडी धरणाचा विसर्ग वाढला

उजनी, जायकवाडी धरणाचा विसर्ग वाढला

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : उजनी धरणातील विसर्ग वाढवून एक लाख क्यूसेक करण्यात आला आहे. वीर धरणाचादेखील विसर्ग १५ हजार एवढा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीकाठच्या नागरिकांची चिंता परत वाढली आहे. विसर्ग वाढविल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीतदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून दीड लाख क्युसेकने पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उजनी आणि वीर धरणातून काल सोडलेल्या पाण्याचा विसर्ग आज पंढरपूरमध्ये पोचू लागल्याने हे पुराचे पाणी शिरू लागलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीमधील नागरिकांना सुरक्षित जागी हलविण्यास सुरुवात झाली आहे. आज सायंकाळी चंद्रभागा तीरावर असणा-या व्यास नारायण वसाहतीतील अनेक घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. रात्री ही पाणी पातळी अजून वाढणार असल्याने प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांनी या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था केली आहे. पाणी किती वाढणार याचा नेमका अंदाज येत नसला तरी या भागातील बहुतांश घरात आज रात्री पाणी शिरण्याची शक्यता आहे. या भागातील जवळपास शंभर कुटुंबे तसेच महाद्वार घाटावर राहणा-या काही कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या