23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरउजेड जि. प. शाळेचे शंभरीत पदार्पण

उजेड जि. प. शाळेचे शंभरीत पदार्पण

एकमत ऑनलाईन

उजेड/शकील देशमुख : शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. तिथे मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळते. शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक व नैतिक विकास होत असतो. याच गोष्टी घेऊन पुढे जात हिसामाबाद जिल्हा परिषद शाळेने शंभरीत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे.

स्वातंत्र्यापुर्वी १९२३ साली स्थापन झालेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा हिसामाबाद या शाळेने गुणवत्ता पुर्ण शिक्षण देत शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. या शंभर वर्षाच्या वाटचालीत शाळेने उजेडसह परिसरातील हजारो बालकांना शिक्षण व संस्कार दिले आहेत. यातील हजारो विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत नाव कमावले आहेत.

दरम्यान महात्मा गांधी यांची यात्रा भरविणा-या हिसामाबाद उजेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण सुविधा देण्यासाठी तत्कालीन निजाम सरकारने स्थापन केलेली ही शाळेची सरकारी शाळा अशी पूर्वीची ओळख. त्या काळी उर्दू, मोडी, मराठी भाषेतून पहिल्या पीढिने शिक्षण घेतले. तसेच या शाळेत सत्तरच्या दशकात संगीत ज्ञान ही दिले जात होते. यासाठी गावचे जमीनदार चाँद पटेल यांनी तजवीज केली होती. तर शाळेसाठी यशवंतराव पाटील यांनी जागा उपलब्ध करून दिली होती.स्वातंत्र्यापूर्वी व नंतर या शाळेने आपली गुणवत्ता कायम ठेवली ती आजतागायत सुरु आहे. तत्कालिन उस्मानाबाद जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण शाळा असा या शाळेचा लौकिक राहिलेला आहे. स्थापनेपासून आजपर्यंत शाळेत मुलांना शिक्षित व संस्कारीत करण्यासाठी सर्व गुरुजणांचे मोलाचे योगदान आहे. यासाठी शताब्दी महोत्सव समिती परिश्रम घेत आहे.

शताब्दी वर्षात विविध कार्यक्रम
१७ सप्टेंबरला शताब्दी वर्षाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले असून येत्या २ ऑक्टोबरला गांधी जयंती दिनी डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थितीत गुरुजणांचे ऋण व्यक्त करण्यात येणार आहे. महात्मा गांधीयात्रेपुर्वी आजी माजी विद्यार्थ्यांचा स्रेह मेळावा तर शैक्षणिक वर्षाच्या शेवटी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शताब्दी वर्ष समारोह आयोजित करुन शताब्दी वर्षाच्या स्मरणिकेचे प्रकाशन व शाळेचा शताब्दी वर्ष साजरा करण्यात येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या