पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी सुरू आहे. विविध पक्षांच्या अनेक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
यातच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांनी सर्व पर्यायांना बाजूला ठेवून पणजीतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे यावेळी कॉंग्रेस नेते उदय मडकईकरही उत्पल यांच्यासोबत होते. उत्पल पर्रिकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शेकडो समर्थकांनी उपस्थिती लावत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला.