26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रउदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने पेढा भरवला !

उदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने पेढा भरवला !

एकमत ऑनलाईन

सातारा : अनेक नेते आपल्या कार्यकर्त्यांवरच्या प्रेमापोटी हे करतातच. पण हाताने नव्हे, चक्क तोंडाने उदयनराजेंनी या कार्यकर्त्याला पेढा भरवला आहे. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावरुन उदयनराजेंचे चांगलेच कौतुक केल्याचं दिसून येत आहे.

उदयनराजे भोसले आपल्या खास अंदाजामुळे कायमच चर्चेत येत असतात. कधी कॉलर उडवणं, कधी दुचाकीवर फिरणं यामुळं ते आपल्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत.

आत्ताही त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. भाजपा खासदार उदयनराजे भोसले साता-याला गोडोली भागातल्या आपल्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसासाठी गेले होते. विनोद मोरे नावाच्या एका कार्यकर्त्याचा वाढदिवस त्यांनी साजरा केला. यावेळी त्यांनी मोरे यांचं कौतुक करत त्यांना पेढा भरवला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या