24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रउदय सामंतांना जाळून मारण्याची धमकी

उदय सामंतांना जाळून मारण्याची धमकी

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पोलिसांसमोरच जाळून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या काल झालेल्या राजापुरातल्या सभेमध्ये ही घटना घडली आहे. रिफायनरीला विरोध करणा-या एका कार्यकर्त्याने नाना पटोले आणि पोलिसांसमोरच ही धमकी दिली आहे.

धमकी दिलेल्या या नेत्याचे नाव जोशी असल्याचं सांगितले जात आहे. त्याने दिलेल्या धमकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ही घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस अधिक्षक मोहनकुमार गर्ग यांनी उदय सामंत यांच्याशी याविषयी चर्चा केली आणि पुढील चौकशीची ग्वाही दिली.

रिफायनरीचे विरोधक उदय सामंतांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. रिफायनरी समर्थक आणि विरोधक यांनी राजापुरात नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी आपली भूमिका मांडत असताना रिफायनरी विरोधकांचा संताप अनावर झाला. त्यानंतर त्यातल्या जोशी यांनी उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी दिली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पोलिसही उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या