मुंबई : वृत्तसंस्था
गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे पाठ फिरवत असल्यावरून राज्यात आधीच गदारोळ उठला होता. त्यात हत्तींचीही रवानगी परराज्यात केली जात असताना आता वाघ आणि बिबट्यांनाही गुजरातचा रस्ता दाखविण्यात आल्याने पुन्हा एकदा राज्य सरकार तोंडघशी पडणार आहे.
केंद्र सरकारच्या गुजरात प्रेम उळळ््या येत असल्यावरून विरोधकांनी पुन्हा आगपाखड सुरू केली आहे. गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील चार वाघ आणि बिबटे अलिकडेच गुजरातला रवाना करण्यात आले. विशेष म्हणजे देशातील दहा ते अकरा प्राणिसंग्रहालय आधीच मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना हिरवा झेंडा न दाखविता केंद्र सरकारने आठच दिवसांत कागदोपत्राची कसरत करीत प्राणी गुजरातला पळविले. त्यामुळे केंद्र सरकारकडून गुजरात सरकारचे सुरू असलेले लाड अन्य राज्यांमध्ये नाराजाची सूर उमटत आहे.
गोरेवाडा प्रकल्पातून काही दिवसांपूर्वी दोन वाघ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्यात आले. हे वाघ नेताना गुजरातच्या जामनगरमधील उद्योगपतीच्या खासगी प्राणिसंग्रहालयातील काही अधिकारी गोरेवाडा प्रकल्पात आले. त्यांनी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी नसताना गोरेवाडाच्या रेस्क्यू सेंटरकडे बिबट्यांची मागणी केली होती.
मात्र, केंद्रीय प्राणिसंग्रहालयाची परवानगी नसल्याने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)यांनी वन्यप्राणी हस्तांतरणास नकार दिला. जामनगर येथील अधिका-यांनी त्यांच्या वरिष्ठांना तसा निरोप दिला. त्यानंतर, केंद्र सरकारकडून सूत्रे हलविली गेली. त्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत गोरेवाडा प्रशासनाला केंद्रीय प्राणिसंग्रहालयासह राज्य शासन, प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या परवानग्या देण्यात आल्या. कायद्याच्या चौकटीत राहून गोरेवाडा प्रशासनाने वन्यप्राणी हस्तांतरणास होकार दिला. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी चार वाघ आणि चार बिबटे गुजरातकडे रवाना झाले.
वन्यप्रेमींची नाराजी
देशातील तीन प्राणिसंग्रहायांनी तीन वर्षांपूर्वी वाघ आणि बिबट्यांचे हस्तांतरण करावे, अशी केली होती. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाने त्याला केराची टोपली दाखवून अवघ्या तीनच दिवसांत गुजरातच्या जामनगरला झुकते माप दिल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये नाराजी आहे.