मुंबई : यंदा मार्चपासून कडाक्याच्या उन्हाचा थेट फायदा एसी आणि कूलर विक्रेत्यांना होताना दिसत आहे. गेल्या एका महिन्यात एसी, कूलर आणि फ्रीज सारख्या वस्तूंच्या विक्रीत वार्षिक आधारावर ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. साधारणत: एप्रिलमध्ये उष्णता वाढल्याने एसी, कुलर आणि फ्रीजची विक्री वाढते. मात्र यंदा महिनाभरापूर्वीच्या कडाक्याच्या उन्हामुळे त्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे.
व्हाईट गुड्स उद्योगाच्या मते एसी, कुलर आणि फ्रीजच्या मागणीने कोविडपूर्व पातळी ओलांडली आहे. गेल्या महिन्यात कुलर आणि एसीच्या विक्रीत ४०-५० टक्के वाढ झाली आहे. कच्चा माल महागल्याने त्यांच्या किमती वाढल्या आहेत.