21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयउपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांच्या मागे सीबीआयचा ससेमिरा!

उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांच्या मागे सीबीआयचा ससेमिरा!

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारमध्ये आज नितीशकुमार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या सरकारमध्ये तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री आहेत. सरकार बदलताच बिहारमध्ये सीबीआय पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. कारण बिहारचे नवनिर्वाचीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह त्याच्या पक्षाच्या सीबीआयने अडचणी वाढवण्याची तयारी केली आहे. आयआरसीटीसी हॉटेल घोटाळ््याचा खटला जलदगतीने चालवावा, अशी सीबीआयची इच्छा आहे.

या प्रकरणी सीबीआयने सादर केलेल्या आरोपपत्रात बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, लालूप्रसाद यादव, राबडीदेवी यांना आरोपी केले आहे आणि त्याच्या या घोटाळ््यात आणखी ११ जणांनाही आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. एजन्सीने ४ वर्षांपूर्वी विशेष सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. परंतु आजपर्यंत या प्रकरणात आरोप निश्चित करण्याबाबत चर्चाही सुरू झालेली नाही.

या प्रकरणातील एका आरोपीने फेब्रुवारी २०१९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआयच्या कारवाईच्या विरोधात आव्हान दिले होते. या प्रकरणात आपले नाव समाविष्ट करण्यापूर्वी एजन्सीने सरकारची मान्यता घेतली नसल्याचे त्यांनी म्हटले होते. गुन्हा घडला तेव्हा तो सरकारी कर्मचारी असल्याने असे करणे आवश्यक होते. या आधारे सीबीआय कोर्टाने आरोपपत्राची दखल घेण्याचेही आव्हान होते. त्यांच्या अर्जावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने विनोद कुमार अस्थाना यांना ट्रायल कोर्टात हजर राहण्यापासून दिलासा दिला होता. यानंतर सरकारी कर्मचारी असलेल्या अन्य दोन आरोपींनीही असाच अर्ज दाखल केला होता. त्यामुळे खटल्याला विलंब झाला आणि आजपर्यंत या प्रकरणातील आरोपांवर युक्तिवाद सुरू झाला नव्हता.

सीबीआयने गेल्या आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून अस्थाना यांच्या याचिकेवर निर्णय घेण्याची मागणी केली होती. याशिवाय सीबीआयने असेही म्हटले होते की ते अस्थाना यांच्या अर्जावरील निर्णयानुसारच आरोप निश्चित केले जातील, अशी अट ठेवू शकते. मात्र आरोपांवर आता चर्चा सुरू करण्यास परवानगी द्यावी.

दरम्यान ही घटना २००४ मधील आहे, जेव्हा लालूप्रसाद यादव यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्री होते. यामध्ये लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव, आणि राबडीदेवी यांच्यावर आरोप आहे की, यांनी मिळून सरकारी टेंडरमध्ये छेडछाड करून आयआरसीटीसी हॉटेल्स वाटप केली. सीबीआयच्या म्हणण्यानुसार लालूप्रसाद यादव यांनी पाटणामधील चाणक्य हॉटेल मालकांची आयआरसीटीसीच्या अधिका-यांमार्फत भेट घेतली. हे त्याच्याकडून गैरवर्तन होते. या बैठकीत लालू आणि राबडी यांच्याशी संबंधित कंपनीचे लोकही सहभागी झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या