26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रउमरीचे उत्तरवार देणार विठ्ठल-रुक्मिणीला सुवर्ण मुकुट

उमरीचे उत्तरवार देणार विठ्ठल-रुक्मिणीला सुवर्ण मुकुट

एकमत ऑनलाईन

सुवर्ण मुकुटाची किंमत १ कोटी ३ लाख, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार अर्पण

हिंगोली : नांदेड जिल्ह्यातील उमरीचे माजी नगराध्यक्ष आर्यवैश्य समाजसेवक विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मूर्तीला दोन सुवर्ण मुकुट अर्पण करण्याचा संकल्प केला होता. त्या अनुषंगाने आषाढी एकादशीला तो पूर्णत्वास जाणार आहे. एकूण १९६८ ग्राम शुद्ध सोन्यापासून मुकुटांची निर्मिती करण्यात आली आहे. या मुकुटांची किंमत १ कोटी ३ लाख रुपये आहे.

विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार सराफ यांच्याकडून हे मुकुट अर्पण करण्यात येणार आहेत. विजयकुमार व जयश्री उत्तरवार समवेत त्यांचे सुपुत्र ओमकार, अरविंद, अजय, अच्युत व डॉ. अनंत उत्तरवार या कार्यक्रमावेळी सहभागी होणार आहेत, अशी माहिती विजयकुमार उत्तरवार यांनी हिंगोलीत दिली.

कोरोनाच्या सुरुवातीला विजयकुमार उत्तरवार यांनी उमरी न. प.,सरकारी दवाखाना व पोलिस ठाणे कर्मचा-यांच्या कार्यगौरवार्थ लाखो रुपयांची देणगी दिली होती. त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल त्यांचा व कुटुंबीयांचा सत्कार त्यांचे भाचे डॉ. विजय नीलावार यांनी केला. या कार्याचे वारकरी संप्रदायाकडून कौतुक होत आहे. नांदेड येथील हे उत्तरवार कुटुंब आषाढी एकादशीला विठुरायला १ कोटी रुपयांचे दोन सुवर्ण मुकुट अर्पण करणार आहे. त्यांना ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंदिराला द्यायचे आहेत. त्यामुळे आषाढीच्या निमित्ताने हे मुकुट दिले जाणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या