27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeउस्मानाबाद महिला आट्यापाट्या संघास सुवर्ण

उस्मानाबाद महिला आट्यापाट्या संघास सुवर्ण

एकमत ऑनलाईन

येडशी : शेगाव (जि.बुलढाणा) येथे पुरुष व महिला राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धा दि. १८ ते २० मे यादरम्यान पार पडली. स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हा महिला संघाने ठाणे, अमरावती, सोलापूर, जळगाव या संघाचा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली. नेहमीप्रमाणे तुल्यबळ संघ असलेल्या भंडारा या संघासोबत अंतिम लढत झाली. अटीतटीच्या लढतीत भंडारा संघाचा २-१ असा पराभव करून सुवर्ण पदक कायम राखले.

विजेत्या संघाला उपस्थित मान्यवर व भारतीय आट्यापाट्या फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव डॉ. दीपक कवीश्वर, सोलापूर जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब कापसे, उपाध्यक्ष राजकुमार मुंबरे, वाशिम जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे सचिव डॉ. विवेक गुल्हाने, अकोला जिल्ह्याचे सचिव सोनखासकर, यांच्या उपस्थितीत विजेत्या संघाला चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संघात शितल श्ािंदे (कर्णधार) शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू कुमारी गंगासागर श्ािंदे, शिल्पा डोंगरे, प्रीती श्ािंदे, निकिता शिंदे, वैष्णवी श्ािंदे ,अनुजा लोंढे, गायत्री माळकर, अक्षता मगर, ऋ तुजा काटे, ऋ तुजा माळकर, साक्षी एडके या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

पुरुष संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून उपांत्य सामन्यापर्यंत धडक मारली. पण तिथे अकोला संघाबरोबर पराभव स्वीकारावा लागला व स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सदरील संघाला अनिल श्ािंदे, राजाभाऊ श्ािंदे, अमित भागुडे, जिल्हा संघटनेचे सचिव शरद गव्हार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सोमवंशी, सल्लागार संजय घुले व सर्व पदाधिकारी व क्रीडाप्रेमी यांनी अभिनंदन केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या