24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयऍमेझॉन-गांजा प्रकरणाचा तपास अधिका-यांची बदली

ऍमेझॉन-गांजा प्रकरणाचा तपास अधिका-यांची बदली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऍमेझॉनच्या माध्यमातून गांजा तस्करी करणारे रॅकेट मध्य प्रदेशमधल्या भिंड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी उघडकीस आणले होते. या प्रकरणात मध्य प्रदेश आणि विशाखापट्टणममधून काही व्यक्तींना अटकही करण्यात आली होती. मात्र या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे.

कारण आता या प्रकरणाचा पर्दाफाश करणारे एस. पी. मनोज कुमार सिंह यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांना भोपाळ पोलिस मुख्यालयात पाठवण्यात आले असून, पोलिस मुख्यालयातले शैलेंद्र चौहान हे भिंडचे एसपी म्हणून मनोज कुमार सिंह यांची जागा घेणार आहेत.

मनोज कुमार सिंह यांनी भिंडचे एसपी म्हणून पदभार स्वीकारून एक वर्षही झाले नव्हते. त्यापूर्वीच ही बदली करण्यात आल्यामुळे याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने हे सर्व ऍमेझॉनच्या दबावाखाली होत असल्याचा आरोप केला आहे. या ई-कॉमर्स वेबसाइटने मध्य प्रदेश सरकारवर दबाव आणून अधिका-यांची बदली करायला लावली असल्याचे सीएआयटीचे म्हणणे आहे. या संघटनेने या प्रकरणी निषेधही व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या