मुंबई : शिवसेनेचे बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे सायंकाळी ७ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे कोणता बॉम्ब फोडणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह गुवाहाटीत आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार असल्याचा दावा ते करीत असून, आमचीच खरी शिवसेना असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व आमदारांना हजर राहण्याचे आदेश असताना आपण गटनेते असल्याने प्रतोद नेमण्याचा अधिकार आपल्याला असून, आपण गोगावले यांची निवड केल्याचे सांगत थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला आव्हान दिले.