प्रयागराज : प्रयागराजमध्ये शनिवारी एक मोठी आणि भयानक घटना उघडकीस आली. येथे एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या करण्यात आली. ही घटना नवाबगंज पोलिस स्टेशन हद्दीतील खगलपूर गावातील आहे. पत्नी आणि ३ मुलींची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे.
त्याचवेळी नव-याचा मृतदेह बाथरूममध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पतीच्या अंगावर धारदार शस्त्राच्या जखमा नाहीत. मात्र, हातावर व अंगावर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. मृतांमध्ये पती-पत्नी राहुल तिवारी (४२), प्रीती (३८) आणि माही, पिहू आणि पोहू या तीन मुलींचा समावेश आहे. पतीनेच हे हत्याकांड घडविल्याचा पोलिसांना संशय आहे.