22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeराष्ट्रीयएक्स्प्रेस रेल्वेचा मोठा अपघात टळला

एक्स्प्रेस रेल्वेचा मोठा अपघात टळला

एकमत ऑनलाईन

रेल्वे रुळावर झाड कोसळले, मोटारमनच्या प्रसंगावधानामुळे वेळेत ब्रेक
ठाणे : ठाण्यातील मुंब्रा परिसरात एका रेल्वे एक्स्प्रेस गाडीचा अपघात होण्याचा अनर्थ टळला. बिहारहून मुंबईच्या दिशेने मुंब्राजवळ रेल्वे रुळांवर एक झाड पडले होते. प्रसंगावधान राखत रेल्वे मोटारमनने वेळेत ब्रेक लावला आणि पुढचा अनर्थ टळला. जर रेल्वेचा एखादा डब्बा रुळांवरून घसरला असता तर अनर्थ होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. तब्बल १ तासाच्या प्रयत्नानंतर ही एक्स्प्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

ठाण्यातील मुंब््रयाजवळ रेल्वेचा मोठा अपघात होता होता टळला आहे. बिहारहून मुंबईच्या दिशेने येत असलेल्या भागलपुर एक्सप्रेसबाबत हा प्रकार घडला. २७ जूनच्या रात्री ९ च्या सुमारास भागलपूर एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दिशेने जात असताना एक भले मोठे झाड रेल्वे रुळांवर पडले होते. ही बाब मोटरमनच्या निदर्शनात आल्यानंतर मोटरमनने सावधानता दाखवत एक्स्प्रेसला ब्रेक लावला आणि पुढील अनर्थ टळला.

या एक्स्प्रेस गाडीला ब्रेक लावल्यानंतर गाडी थांबली. मात्र थांबता थांबता या गाडीचे दोन ते तीन डबे हे रुळांवर पडलेल्या झाडाच्या फांद्यांवरून पुढे गेले. मात्र परिस्थिती मोटरमनच्या नियंत्रणात होती. जर या फांद्यांमुळे रेल्वेचा एखादा डब्बा रुळावरून खाली उतरला असता तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

एक्स्प्रेस गाडी थांबल्यानंतर मोटारचालकाने लागलीच ही बाब रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर रेल्वे पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचून रेल्वेच्या पटरीवर पडलेल्या या फांद्या हटवण्याचे काम केले. तब्बल १ तासांच्या प्रयत्नानंतर या रुळांवरून फांद्या आणि झाड हटवण्यात अग्निशमन दलाला यश आले. अखेर १ तास रखडल्यानंतर भागलपूर एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली. मात्र या घटनेमुळे काहीकाळ रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या