22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeक्रीडाएजाज पटेलने रचला इतिहास तरीही पाहुण्यांची घसरगुंडी

एजाज पटेलने रचला इतिहास तरीही पाहुण्यांची घसरगुंडी

एकमत ऑनलाईन

न्यूझिलंडचा डाव एकूण २८.१ षटकांत ६२ धावांवर आटोपला. यजमानांनी २६३ धावांची आघाडी घेतली तरीही विराट कोहलीने फॉलोऑन लादला नाही. मोहम्मद शिराज, रविचंद्रन आश्विन, अक्षर पटेल आणि जयंत यादव या गोलंदाजांनी न्यूझिलंडला सर्वांत कमी धावांत गुंडाळले. पहिल्या डावात मयांक अग्रवालच्या दीडशतकी आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकी खेळीवर गोलंदाज एजाज पटेल याने जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला.

इंग्लंडच्या जिम लेकर यांनी १९५६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध मँचेस्टर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर भारताच्या अनिल कुंबळेने १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. एजाजने ४७.५ षटकांत ११९ धावांत १० विकेट्स घेतल्या. त्यात त्याने १२ निर्धाव षटकंही फेकली. मयांक अग्रवाल व शुभमन गिल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. चेतेश्वर पुजारा पुन्हा अपयशी ठरला. कर्णधार विराट कोहलीला चुकीच्या निर्णयाचा फटका बसला पण तिस-या पंचांनासुद्धा स्लो मोशनमध्ये पहिल्यांदा चेंडू बॅटला लागला की पॅडला हे समजणे अवघड होते. पण, मयांकने श्रेयस अय्यर व वृद्धिमान साहा यांच्यासह टीम इंडियाचा डाव सावरला.

दुस-या दिवसाच्या पहिल्याच षटकात एजाज पटेलने साहाला (२७) पायचीत केले अन् पुढच्याच चेंडूवर आर. अश्विनला अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत केले. किवी खेळाडू जल्लोष करत असताना अश्विन डीआरएसची मागणी करताना दिसला. आपण नेमकं कसं बाद झालोय, हेच त्याला कळेनासे झाले होते. अक्षर पटेलने किवी गोलंदाज पटेलची हॅट्ट्रिक मात्र हुकवली. अक्षर व मयांक यांनी सातव्या विकेटसाठी दमदार खेळ केला. ही जोडी तोडण्यासाठी टीम साऊदी, कायले जेमिन्सन, विलियम सोमरविले या सर्वांनी प्रयत्न केले, परंतु अखेर यश एजाज पटेललाच मिळाले. त्याने लंचब्रेकनंतर मोठी विकेट घेतली. मयांक ३११ चेंडूंत १७ चौकार व ४ षटकारांसह १५० धावांवर माघारी परतला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक तीनवेळा १५० हून अधिक धावा करण्याच्या रोहित शर्माच्या विक्रमाशी मयांकने बरोबरी केली. एका घटनेचे मात्र वाईट वाटले ते म्हणजे गेल्या कसोटीत कर्णधार असणा-या अजिंक्य रहाणेला पाणी घेऊन मैदानावर पाठवले होते.

अक्षर पटेलने आक्रमक खेळ करताना सोमरविलेला ४, ६, ३ असे चोपले. अक्षरने ११३ चेंडूंत कसोटीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पण, एजाजने पुन्हा खोडा घातला, अक्षरला ५२ धावांवर पायचीत करून आठवी विकेटही नावावर केली. कसोटी क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. एजाजने १० विकेट्स घेताना ऐतिहासिक कामगिरी केली. भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर गुंडाळला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या