26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रएनसीबी चौकशीच्या फे-यात

एनसीबी चौकशीच्या फे-यात

एकमत ऑनलाईन

मुंबई : एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे आर्यन खान प्रकरणावरून वादाच्या भोव-यात सापडले आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडेंवर टीका करत त्यांच्यावर वेगवेगळे आरोप लावत आहेत. आर्यनच्या चौकशीदरम्यान कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लेख करत या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

न्यायालयाने क्लिन चीट दिली असून, ही चौकशी का करण्यात आली, या प्रकरणाची चौकशी व्हायलाच पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचेदेखील वळसे पाटील म्हणाले. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह इतरांना एनसीबीने क्रूझवर छापा टाकत अटक केली होती. मात्र चौकशीदरम्यान आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज आढळून आलेले नाही.

न्यायालयानेदेखील आर्यनकडे चौकशीदरम्यान कोणत्याही प्रकारेच पुरावे मिळाले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी एनसीबी आरोपीच्या पिंज-यात उभी राहणार असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

आर्यन खान प्रकरणातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही, तर आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. ड्रग्ज अरबाज खान आणि मुनमुनकडे सापडले आहेत. हे सापडलेले ड्रग्ज हे कमर्शिअल प्रकारातील नसून केवळ त्या व्यक्तीच्या सेवनापुरते आहेत. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज, मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचे षडयंत्र रचलेले दिसून येत नाही, अशी टिप्पणी २८ ऑक्टोबरला दिलेल्या जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये कोणताही कट रचलेले दिसून येत नाही, असेदेखील न्यायालयाने म्हटले आहे.

वानखेडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामध्ये राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे आर्यन खान प्रकरणावरून वादाच्या भोव-यात सापडले आहेत. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडेंवर टीका करत त्यांच्यावर वेगवेगळे आरोप लावत आहेत. आर्यनच्या चौकशीदरम्यान कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लेख करत या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र पोलिस करणार चौकशी
दरम्यान, आता या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र पोलिस करणार असून, राज्य सरकार विरुद्ध केंद्रीय यंत्रणा यांच्यातील वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर त्यांनाच चौकशीच्या फे-यात ओढण्याची तयारी राज्य सरकार करतेय का, हे येणा-या काळात स्पष्ट होईल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या