24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयएप्रिल ते जुलै वित्तीय तूट ३.४१ लाख कोटींवर

एप्रिल ते जुलै वित्तीय तूट ३.४१ लाख कोटींवर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंटंसने यंदाच्या वित्तीय तुटीची आकडेवारी जाहीर केली असून एप्रिल ते जुलै या दरम्यानची वित्तीय तूट ही ३.४१ लाख कोटी रुपये इतकी आहे. या वर्षीच्या अंदाजित वित्तीय तुटीच्या प्रमाणाच्या ते २०.५ टक्के इतके आहे.

गेल्या वर्षीचा म्हणजे २०२१ चा विचार करता एप्रिल ते जुलै महिन्याची वित्तीय तूट २१.३ टक्के इतकी होती. या आकडेवारीचा विचार करता यंदाची वित्तीय तूटही ६ टक्क्यांच्या वरती राहण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने यंदाच्या आर्थिक वर्षी वित्तीय तूट ही १६.६१ लाख कोटी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ही आकडेवारी जीडीपीच्या एकूण ६.४ टक्के इतकी आहे.

यंदाच्या आकडेवारीचा विचार करता आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्यातील फिस्कल सरप्लस ११,०४० कोटी रुपये इतकी आहे. गेल्या २८ महिन्यांमध्ये पहिल्यांदाच अर्थव्यवस्थेमध्ये फिस्कल सरप्लस पाहायला मिळाले आहे. या आधी मार्च २०२० मध्ये म्हणजे कोरोनाच्या महामारीची सुरुवात व्हायच्या आधी फिस्कल सरप्लस पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता पुन्हा फिस्कल सरप्लसची स्थिती आहे.

जुलै महिन्याचा विचार करता केंद्र सरकारच्या नेट टॅक्स रेव्हेन्यूमध्ये ३८ टक्क्यांची भर पडली आहे. मागच्या महिन्यात १.६ लाख कोटी रुपये इतका नेटल टॅक्स रेव्हेन्यू जमा झाला होता. नॉन टॅक्स रेव्हेन्यूमध्ये दुप्पट वाढ होऊन तो २७.४२३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. एप्रिल ते जुलैदरम्यान केंद्र सरकारचा एकूण खर्च हा ११.२७ लाख कोटी रुपये इतका आहे, तर याच काळात केंद्राकडे जमा होणारा एकूण महसूल हा ७.८६ लाख कोटी रुपये इतका आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या