28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रएमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

एकमत ऑनलाईन

मुंबई : एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून पीसीएम गटातून १३ तर पीसीबी गटातून १४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले. या परीक्षेचा निकाल सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आला असून विद्यार्थ्यांना तो सीईटीच्या अधिकृत संकेस्थस्थळावर पाहता येणार आहे.

इंजिनिअरिंग, मेडिकल आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली एमएचटी सीईटी परीक्षा राज्यातील ३६ जिल्ह्यांतील २२७ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती. ही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने १३ दिवसांत २५ सत्रामध्ये घेण्यात आली होती. पीसीएम आणि पीसीबी या दोन गटांत झालेल्या या परीक्षेत पीसीएम गटातून १३ विद्यार्थ्यांना १०० पर्सेन्टाइल तर पीसीबी गटातून १४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेन्टाइल गुण प्राप्त झाले.

एमएचटी सीईटी परीक्षेला पीसीएम गटाच्या परीक्षेसाठी २,८२,०७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २,३१,२६४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. पीसीबी गटासाठी ३,२३,८७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी २,३६,११५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पीसीएम गटाची सीईटी परीक्षा ५ ते ११ ऑगस्ट दरम्यान पार पडली होती तर पीसीबी गटाची सीईटी परीक्षा १२ ते २० ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या