24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीयएविन लुईस जखमी

एविन लुईस जखमी

एकमत ऑनलाईन

मुंबई : आयपीएल स्पर्धेचा दुसरा टप्पा तोंडावर आलेला असताना राजस्थान रॉयल्सच्या अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत. या स्पर्धेपूर्वी जोस बटलरने वैयक्तिक कारणामुळे माघार घेकली होती. त्यानंतर त्याच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आलेला एविन लुईस देखील जखमी झाला आहे. तो कॅरेबियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये दुखापतग्रस्त झाला आहे. सेंट लुसिया विरुद्धच्या मॅचमध्ये फोर वाचवण्याच्या नादात त्यांचा खांदा दुखापतग्रस्त झाला आहे. सेंट लुसियाच्या इनिंगमधील पाचव्या ओव्हरमध्ये ही घटना घडली.

डॉमिनिक ड्रेक्सच्या बॉलिंगवर रहकीम कॉर्नवॉलने मारलेला बॉल अडवण्याच्या नादात लुईस जखमी झाला. त्यामुळे तातडीने फिजियोला मैदानात बोलवण्यात आले. त्यांनी मैदानातच लुईसवर उपचार केले. मात्र त्यानंतर थोड्यावेळाने तो मैदानाच्या बाहेर गेला.

त्यानंतर लुईस बॅटींगला उतरला. पण फक्त ६ रन काढून आऊट झाला. राजस्थानला धक्का लुईसची दुखापत गंभीर असेल तर तो राजस्थान रॉयल्ससाठी मोठा धक्का असणार आहे. कारण यापूर्वी बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर या महत्त्वाच्या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्याने राजस्थान अडचणीत आहे.

लुईस सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. नुकत्याच संपलेल्या सीपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन बनवणा-या खेळाडूंच्या यादीत तो दुस-या क्रमांकावर होता. अ‍ॅशेस सीरिज संकटात, इंग्लंडचे दिग्गज खेळाडू बहिष्कार टाकण्याच्या तयारीत त्याने ११ मॅचमध्ये ४७.३३ च्या सरासरीने ४२६रन काढले आहेत. त्याचबरोबर सीपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक ३८ सिक्स देखील लगावले. त्यानं या स्पर्धेत ३ अर्धशतक आणि १ शतक झळकावले असून त्याचा स्ट्राईक रेट १६३ पेक्षा जास्त आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या