22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रओबीसीच्या ४०० जागांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

ओबीसीच्या ४०० जागांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

एकमत ऑनलाईन

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलत ओबीसी संवर्गातील जागांवर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. राज्यातील १०६ नगरपंचायतींमध्ये एकूण १ हजार ८०२ जागांसाठी निवडणूक होणार होत आहे. या एकूण जागांपैकी ओबीसींच्या ४०० जागांवरील निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे ओबीसीला धक्का बसला आहे.

राज्य सरकारने एक अध्यादेश काढत ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाची पुनर्स्थापना केली होती. मात्र हा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयात टिकू शकला नाही. या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. ओबीसींना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला ओबीसी समाजाची आरक्षणासाठीची लोकसंख्येची आकडेवारी गोळा करावी लागणार आहे. ही आकडेवारी एखाद्या आगोगामार्फत करावी लागणार आहे. तसे झाल्यानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत निर्णय घेता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या ६ डिसेंबर २०२१ च्या आदेशानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या आहेत; परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू राहील. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी सांगितले.

मैदानात उतरलेल्या उमेदवारांचा हिरमोड
याशिवाय भंडारा नगरपरिषदेत ५२ जागांवर निवडणूक होत आहे. त्यातील ओबीसींच्या १३ जागांवरील निवडणुकीला स्थगिती मिळाली आहे. गोंदियातील जि. प. मध्ये ५३ पैकी १० ओबीसी जागांच्या निवडणुका स्थगित आहेत. पंचायत समितीत ४५ ओबीसी जागा आणि मनपाची १ जागा यांच्या निवडणुकीलाही स्थगिती देण्यात आली. याशिवाय राज्यातील ५ हजार ४५४ ग्रामपंचायतींपैकी ७,१३० जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यातही ओबीसी राखीव जागांची निवडणूक स्थगित झाल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या