22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeराष्ट्रीयओबीसी आरक्षणावर आता उद्या सुनावणी

ओबीसी आरक्षणावर आता उद्या सुनावणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मंगळवारी होणारी ओबीसी आरक्षणाची सुनावणी एक दिवस लांबणीवर गेली आहे. त्यामुळे ही सुनावणी आता २० जुलै रोजी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या भवितव्यासंदर्भात फैसला आणि महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबतची सुनावणी आता एकाच दिवशी होणार आहे. या दोन्ही सुनावण्या राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.

महाराष्ट्रात पुन्हा ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार का, बांठिया आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्ट ग्रा धरणार का, या सगळ््या प्रश्नांची उत्तरे आता २० जुलैला मिळणार आहेत. ज्या ठिकाणी निवडणूक अधिसूचना निघालेली आहे. त्यात आता हस्तक्षेप होणार नाही. पण ज्या ठिकाणी अधिसूचना निघालेली नाही. तिथे मात्र तूर्तास कुठली नवी अधिसूचना नको. पुढच्या सुनावणीवेळी आम्ही या सगळ््याबाबत निर्देश देऊ, असे कोर्टाने म्हटले होते. बांठिया आयोगाचा अहवाल राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात सादरही केला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाने ज्या ट्रिपल टेस्टची पूर्तता करायला सांगितले आहे. त्याच आधारावर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय हा रिपोर्ट असल्याचा सरकारचा दावा आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या