बंगळुरू : बंगळुरू येथील ओमिक्रॉन बाधित डॉक्टर पूर्णपणे बरा झाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा त्याचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या डॉक्टरला सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या माहितीला बंगळुरू महापालिकेकडून दुजोरा देण्यात आला आहे.
भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे पहिले दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळले. यापैकी एक रुग्ण दक्षिण आफ्रिकन असून तो जीनोम सीक्वेन्सिग अहवाल येण्याआधीच देशाबाहेर गेला आहे. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दुसरा रुग्ण स्थानिक आणि पेशाने डॉक्टर आहे. ४६ वर्षीय डॉक्टरची ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती, तरीही त्याला ओमिक्रॉनने गाठले.