29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeआंतरराष्ट्रीयओमिक्रॉनला गांभीर्याने घ्या

ओमिक्रॉनला गांभीर्याने घ्या

एकमत ऑनलाईन

जिनेव्हा : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनने संपूर्ण जगावर भीतीचे सावट निर्माण केले असताना डेल्टाच्या तुलनेत तो कमी धोकादायक असल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी मात्र ओमिक्रॉनमुळे संपूर्ण जगभरात मृत्यू होत असताना सौम्य म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका असा इशारा दिला आहे.

ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी कोरोनाचा नवा व्हेरियंट वेगाने संसर्ग फैलावत असून, मोठ्या प्रमाणात लोकांना लागण होत असल्याचे सांगितले आहे. अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनने डेल्टालाही मागे टाकले असून, याचा अर्थ रुग्णालयांमध्ये गर्दी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. ओमिक्रॉन डेल्टाच्या तुलनेत आणि खासकरून लसीकरण झालेल्यांमध्ये कमी गंभीर असल्याचे दिसून येत आहे, पण याचा अर्थ त्याला सौम्य म्हणून दुर्लक्षित करावे असा होत नाही, असेही ट्रेड्रोस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. मागील अनेक व्हेरियंटप्रमाणे ओमिक्रॉनदेखील लोकांना रुग्णालयात दाखल होण्यास भाग पाडत असून, मृत्यूसाठी जबाबदार ठरत आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

९० लाख ५ हजार रुग्णांची नोंद
खरे तर केसेसची त्सुनामी इतकी मोठी आणि जलद आहे की जगभरातील आरोग्य यंत्रणांवरील बोझा वाढला आहे, असे ते म्हणाले आहेत. गेल्या आठवड्यात जगभरात ९० लाख ५ हजार रुग्ण आढळल्याची नोंद जागतिक आरोग्य संघटनेकडे आहे. ही वाढ तब्बल ७१ टक्क्यांची आहे.

श्रीमंत देशांवर नाराजी
टेड्रोस यांनी श्रीमंत देशांकडून लसींचा जास्तीत जास्त साठा घेतला जात असल्याने नाराजी जाहीर केली असून, यामुळे इतर व्हेरियंट निर्माण होण्यासाठी परिपूर्ण वातावरण तयार केले आहे, अशा शब्दांत टीका केली. यामुळे किमान २०२२ मध्ये तरी लसींचे योग्य वाटप व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या