29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयओमिक्रॉनशी दोन हात करण्यास भारत तयार

ओमिक्रॉनशी दोन हात करण्यास भारत तयार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आपल्या सर्व सीमा बंद करून विदेशातून येणा-या सर्व लोकांची स्क्रिनिंग, टेस्टिंग आणि क्वारंटाईनसारख्या उपाययोजना केल्या. तसेच लसीकरणाच्या मोहिमेलादेखील गती दिली. याशिवाय देशातील प्रवाशांसाठी फेस मास्क आणि लसीकरण प्रमाणपत्राचे आदेशही लागू केले. नव्या व्हेरिएंटला रोखण्यासाठी हे प्रभावी उपाय योजून दोन हात करण्यासाठी भारत सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे, असे अ‍ॅक्सेस हेल्थ इंटरनॅशनलचे क्षेत्रीय संचालक डॉ. कृष्णा रेड्डी नल्लामल्ला यांनी म्हटले आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत पाच पटीने अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे नव्या व्हेरिएंटची लागण होण्याचा धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी केंद्र सरकारने वेळीच पावले उचलून आवश्यक त्या उपाययोजना करायला सुरुवात केली. तसेच सर्वच राज्यांसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या असून, सर्वच राज्यांत ओमिक्रॉनला रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत. मात्र, तरीही देशात आता रुग्ण सापडू लागले आहेत. आता ओमिक्रॉन रुग्णांचा आकडा २० च्या पुढे गेला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून, प्रशासन व्यवस्थेची धावपळ वाढली आहे.

दरम्यान, ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग अधिक असला, तरी त्याची तीव्रता सौम्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या तर रुग्णांमध्ये साधारण लक्षणेच दिसत आहेत. मात्र, दुस-या आणि तिस-या आठवड्यात काय स्थिती होईल, हे आता सांगता येत नसले, तरी जिथे नव्या व्हेरिएंटचा जन्म झाला, त्या दक्षिण आफ्रिकेत रुग्ण वाढले असले, तरी एकही मृत्यू नाही. त्यामुळे या व्हेरिएंटचा धोका कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तरीही सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी मास्क वापरणे, लस घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने भारत सरकार प्रयत्नशील असून, या व्हेरिएंटला रोखण्यासाठी आवश्यक सरकारने आवश्यक उपाययोजनेच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

आरोग्य कर्मचा-यांना बुस्टर डोससाठी साकडे
या पार्श्वभूमीवर आयएमएने देशातील आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, डॉक्टर आणि इतर मनुष्यबळासाठी बूस्टर डोसची केंद्राकडे मागणी केली. या घडीला देशातील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना कोरोना लसीचा अतिरिक्त डोस घेण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी आयएमएने केली. तसेच देशातील निम्म्या लोकसंख्येला पूर्ण लसीकृत केल्याबद्दल आयएमएने सरकारचे अभिनंदन केले.

लसीकरण हाच प्रभावी उपाय
ओमिक्रॉनच्या संकटाचा सामना कसा करावा, यावर जागतिक पातळीवर संशोधन सुरू असताना आयएमएने त्यावर लसीकरण हा प्रभावी उपाय सांगितला आहे. जर आपण पूर्ण लक्ष लसीकरणावर केंद्रीत केले, तर ओमिक्रॉनच्या प्रभावापासून भारत स्वत:चे रक्षण करू शकेल. सर्वांचे लसीकरण हेच ध्येय समोर ठेवून सर्वांनी काम करावे, असे आवाहन आयएमएने केले. ज्यांच्यापर्यंत लसीकरण अद्याप पोहोचलेले नाही आणि ज्या पात्र व्यक्तींनी फक्त एकच डोस घेतला आहे, त्यांच्यापर्यंत यंत्रणेने पोहोचावे, असे आयएमएने नमूद केले.

निष्कारण प्रवास टाळा : आयएमए
ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्यानंतर आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत प्रवासबंदी लागू करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, आयएमएने त्याच्या उलट भूमिका घेतली आहे. आयएमए प्रवासबंदी लागू करण्याचे समर्थन करत नाही. मात्र, विनाकारण प्रवास करू नये, असे आवाहन आयएमएने केले आहे. विशेषत: पर्यटनासाठी किंवा सामाजिक कार्यक्रमांसाठी प्रवास करणे टाळायला हवे. आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने कोविडसंदर्भातील नियमावलीचे काटेकोरपणे पालन करायला हवे, असेदेखील नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या