24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयओमिक्रॉन जगासाठी धोकादायक

ओमिक्रॉन जगासाठी धोकादायक

एकमत ऑनलाईन

जिनेव्हा : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन हा जगासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सोमवार दि. २९ नोव्हेंबर रोजी याबाबतचा इशारा देताना म्हटले की, अत्यंत संक्रमणकारी आणि धोकादायक असणा-या विषाणूबाबतची अनिश्चितता कायम आहे. डब्ल्यूएचओने पुढे म्हटले की, जर या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा मोठी लाट आली तर त्याचे परिणाम हे अत्यंत गंभीर असू शकतात. मात्र, अद्यापपर्यंत तरी ओमिक्रॉन व्हेरियंटशी निगडीत एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या शुक्रवारी कोरोनाच्या या बी.१.१.५२९ व्हेरियंटचे नामकरण करुन त्याचे नाव ओमिक्रॉन असे ठेवले आहे. सर्वांत आधी हा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत आढळला असून तो हळूहळू आपले पाय पसरत आहे. कोरोनाचे इतर व्हेरियंट डेल्टा, अल्फा, बीटा, गॅमा यांच्याप्रकारेच ओमिक्रॉन देखील अत्यंत चिंताकारक अशा वर्गीकरणात मोडतो. त्यामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील प्रतिबंध पुन्हा एकदा लादले आहेत.

वैज्ञानिक आधारावर चाचणी आवश्यक : डॉ. गुलेरिया
दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया म्हणाले, ओमिक्रॉन नावाच्या नवीन प्रकाराबद्दल जी काही माहिती उपलब्ध आहे, ती अनेक शक्यता दर्शवते, परंतु कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची वैज्ञानिक आधारावर चाचणी करणे आवश्यक आहे. डॉ गुलेरिया यांनी रविवारी सांगितले की, ओमायक्रोनचे ३० हून अधिक म्युटेशन्स झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे म्युटेशन्स किंवा बदल विषाणूच्या स्पाइक प्रोटीन प्रदेशात झाले आहेत. डॉ गुलेरिया म्हणाले की, विषाणूच्या स्पाइक प्रोटीनच्या क्षेत्रामध्ये म्युटेशन्स झाल्यामुळे, या प्रकारात अशी क्षमता विकसित होऊ शकते ज्यामध्ये तो रोग प्रतिकारशक्तीला हरवू शकतो.

‘ओमिक्रॉन’चा पहिला फोटो जारी
कोरोनाचा नवा ओमिक्रॉन विषाणूने जगभरात काळजीचे वातावरण निर्माण केले आहे. हा विषाणू कोरोनाच्या डेल्टा विषाणूपेक्षा अनेक पटींनी धोकादायक असल्याचेही तज्ज्ञ सांगत आहे. मात्र, अद्यापही या विषाणूबाबत पुरेशी माहिती समोर आलेली नाही. या विषाणूच्या संरचनेत अनेक बदल झाल्याने हा अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक झाल्याचे निरीक्षण संशोधक व्यक्त करत आहेत. मात्र, या विषाणूचे बदललेले रुप नेमके कसे आहे? हे अद्याप समोर आले नव्हते. आता रोममधील विख्यात बांबिनो गेसू रुग्णालयाने ओमिक्रॉनचा पहिला फोटो जारी केला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या