21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeऔरंगाबादऔरंगाबाद नामांतरावरून शरद पवार यांची नाराजी

औरंगाबाद नामांतरावरून शरद पवार यांची नाराजी

एकमत ऑनलाईन

किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता
औरंगाबाद : औरंगाबाद शहराचे नामांतर करताना कोणतीही चर्चा झाली नव्हती. हा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच हा निर्णय शेवटच्या क्षणी घेतला गेला, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. शरद पवार म्हणाले की, औरंगाबादचे नामांतर हे संभाजीनगर करण्यात आले, हा मविआचा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. हा निर्णय शेवटच्या क्षणी घेतला. प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आम्हाला समजले. पण मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर त्यावर काही बोलणे योग्य नसते. पण या नामांतरापेक्षा औरंगाबादच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष दिले असते तर अधिक चांगले झाले असते, असे पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेना नेते अनिल परब यांनी औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मांडला होता. शेवटच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये त्याला मंजुरी देण्यात आली. यावर शरद पवारांनी भाष्य केले. त्यांनी हा निर्णय घेताना कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा केला. हा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आला आणि नंतर आपल्याला समजल्याची माहिती त्यांनी दिली.

चमत्कारिक राज्यपाल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, आम्ही अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी अशी राज्यपालांकडे मागणी केली होती, ती काही त्यांनी मान्य केली नाही. पण दुसरे सरकार आले आणि त्यांनी ही मागणी ४८ तासांत मान्य केली. त्यामुळे राज्यपाल चमत्कारिक असल्याचे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या