24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयऔषध कंपनीला आग, ६ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर

औषध कंपनीला आग, ६ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर

एकमत ऑनलाईन

अमरावती : आंध्र प्रदेशातील औषधाच्या एका कंपनीत गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. एलुरु जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथे ही घटना घडली असून यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला, तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांपैकी चार जण बिहारमधील स्थलांतरीत कामगार होते.

एलुरु जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेम येथील औषधनिर्माण कंपनीमध्ये गुरुवारी मध्यरात्री अचानक आग लागली. यावेळी रात्रपाळीचे कामगार काम करत होते. अचानक आग लागल्याने कामगारांनी पळ काढला. तरीही सहा जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तसेच १२ जण गंभीर जखमी झाले. मृतांपैकी ४ जण बिहारमधील स्थलांतरीत मजूर होते. वायू गळतीमध्ये ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्यानंतर अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर जवळपास दोन तासांत आग आटोक्यात आली.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी आगीच्या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. तसेच प्रत्येक गंभीर कामगाराला ५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना २ लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. तसेच सरकारी अधिका-यांनी या कामगारांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दिल्या. तसेच पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिका-यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या