26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयकंगना राणावतच्या अडचणीत वाढ

कंगना राणावतच्या अडचणीत वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शीखांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून अभिनेत्री कंगना राणावतच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली विधानसभेच्या शांतता आणि सद्भावना समितीचे अध्यक्ष राघव चड्डा यांनी कंगनाला समन्स पाठवले आहे. त्यामुळे या प्रकरणात कंगनाला ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता समितीसमोर हजर राहावे लागणार आहे. कंगनावर शिख समुदायाविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

कंगनाविरोधात दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीद्वारे तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार इन्स्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल केली आहे. समितीने दिलेल्या माहितीनुसार, कंगनाच्या विरोधात दाखल तक्रार ही मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील सायबर सेलमध्ये केली आहे. शीख समुदायाच्या मते, कंगनाने जाणीवपूर्वक शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आंदोलन असल्याचे वर्णन केले आहे. तसेच शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे, असे शीख समुदायाचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या