29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयकंगना रानावतच्या गालापेक्षा चिकने रस्ते आम्ही बनविणार

कंगना रानावतच्या गालापेक्षा चिकने रस्ते आम्ही बनविणार

एकमत ऑनलाईन

जामताडा : अभिनेत्री कंगणा रानावतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रानावतच्या गालापेक्षाही चिकने बनवले जातील, असे ते म्हणाले. अन्सारी हे झारंखंडच्या जामताडामधील काँग्रेस आमदार आहेत. ते नेहमी वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्ये केल्याने चर्चेत राहिले आहेत.

अभिनेत्री कंगनाच्या गालापेक्षा जामताडाचे रस्ते चिकने बनवले जातील. या रस्त्यांवरून आदिवासी मुले, तरुण आणि व्यापारी वर्गाला फायदा होईल. काही वर्षांपूर्वी लालू प्रसाद यांनी बिहारच्या रस्त्यांबाबत असेच विधान केले होते. बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालासारखा सुंदर रस्ता तयार करीन, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर बराच गदारोळ झाला होता.

वास्तविक, आमदार अन्सारी यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघासाठी सरकारकडून १४ रस्ते मंजूर करवून घेतले आहेत. या रस्त्यांच्या बांधकामासंदर्भात त्यांनी कंगनाविषयी वादग्रस्त विधान केले आहे. जामताडा येथील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण हे आपले प्राधान्य असल्याचे आमदार म्हणाले. परिसरातील आदिवासीबहुल गावातील रस्ते जागतिक दर्जाचे करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
जामताडामधील जनता यापुढे रस्त्यावरील धूळ खाणार करणार नाही, असा दावा त्यांनी केला. विशेषत: सर्व आदिवासीबहुल भागात उत्कृष्ट रस्ते बांधले जातील, जे परिसरातील लोकांसाठी एक मोठी भेट ठरेल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या