22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घट

कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आहे. यूएस बेंचमार्क डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत १२.०६ टक्क्यांनी घसरून प्रतिबॅरल ६८.१५ डॉलर प्रतिबॅरल झाली आहे, तर ब्रेंट क्रूडची किंमत ११.५५ टक्क्यांनी घसरून ७२ डॉलरपर्यंत खाली आली आहे.

युरोपीय देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे कच्च्या तेलांवर परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरणी झाल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी (२८ नोव्हेंबर) पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशातील प्रमुख तेल कंपन्या आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांनी आज इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या