22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्र‘कट कमिशन’मुळे फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर

‘कट कमिशन’मुळे फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर

एकमत ऑनलाईन

मुंबई : वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकरणावरून सध्या महाराष्ट्रात राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यासंदर्भात आता भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘वेदांता प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्रात राजकारण केले जात आहे. जी विधानं केली जात आहेत, त्याने महाराष्ट्रातील जनतेमध्ये पेंग्विन सेनेमार्फत भ्रम पसरवले जात आहेत.

म्हणून त्यावर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. काही वर्तमानपत्रांनी यावर अग्रलेख लिहिले आहेत. यात वेदांता प्रकल्प गुजरातला खेचून नेला असे म्हटले आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की हा प्रकल्प महाराष्ट्रात होता. मग हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू कधी झाला? या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने सर्व परवानगी दिल्या होता का? सवलती दिल्या होत्या का? करारनामा कधी झाला? प्रकल्पासाठी जागा दिली होती का? असे अनेक सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची केली मागणी
भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप करत निशाणा साधला आहे. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, ‘आता आम्ही खोटे सहन करणार नाही. मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे जर पेंग्विन सेना देणार नसेल तर माझी मुख्यमंत्री यांना मागणी आहे की, या विषयावर उच्च स्तरीय चौकशी केली गेली पाहिजे.’

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या