31.8 C
Latur
Saturday, April 1, 2023
Homeमहाराष्ट्रकडक उन्हामुळे भाज्यांची दरवाढ

कडक उन्हामुळे भाज्यांची दरवाढ

एकमत ऑनलाईन

वाशी : उन्हाळा सुरू होताच भाज्यांच्या दरवाढीला सुरुवात होते. वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारावरदेखील कडक उन्हाचा परिणाम जाणवू लागला असून भाज्यांची मागणी अधिक असताना कमी पुरवठा होत असल्याने दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे घाऊक बाजारात वाटाणा, भेंडी, सिमला मिरची आणि गवारची दरवाढ झाली आहे; तर फ्लॉवर, कोबी स्वस्त झाली आहे. हिवाळ्यात भाज्यांचे उत्पादन अधिक असते. त्यामुळे थंडीमध्ये बाजारात भाजीपाल्याच्या जवळजवळ ५५० ते ६०० गाड्या दाखल होत होत्या.
आता मात्र उन्हाळा सुरू होताच भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे सध्या बाजारात फक्त ३०० गाड्यांची आवक होत आहे. उन्हाळ्यात भाज्यांचे उत्पादन कमी होत असल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे.

कोथिंबीर, मेथीचे शेतक-यांकडून मोफत वाटप
त्यामुळे दोन महिन्यांच्या तुलनेत भेंडी, फरसबी, गवार, ढोबळी मिरचीच्या दरात अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर फ्लॉवर, भेंडी पाच रुपये, फरसबी, टॉमेटो, शेवगा, कोथिंबिरीच्या दरांमध्येदेखील चढ-उतार पाहावयास मिळत आहेत.

शेवग्याची शेंग सर्वांत स्वस्त
ढोबळी मिरची सहा रुपयांनी; तर गवारच्या दरांमध्ये दहा रुपयांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे कोथिंबीर, मेथीच्या दरात चार रुपयांनी घट झाली आहे; तर शेवग्याची शेंग ही २० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या