29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमनोरंजनकरिना कपूर, अमृता अरोरा यांना कोरोना

करिना कपूर, अमृता अरोरा यांना कोरोना

एकमत ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. करिना आणि अमृता या दोघी जीवलग मैत्रिणी असून पार्टी गर्ल्स म्हणून त्यांना ओळखले जाते. या दोघीही कोरोनाच्या सुपर स्प्रेडर असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण या दोघींनीही गेल्या काही दिवसांत अनेक पार्ट्यांना हजेरी लावली होती.

मात्र मुंबईतील पार्ट्यांमध्ये सहभागी होत असताना या दोघींनी कोविड नियमांचे उल्लंघन केले असल्याची माहिती आहे. महानगरपालिकेने करिना आणि अमृताच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोविड चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या संपर्कातील आणखी काही सेलिब्रिटींचे अहवाल आज येऊ शकतात.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या