मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करिश्मा मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच करिश्माने चुलत भाऊ रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या लग्नाला हजेरी लावली होती. पंजाबी लग्नात कलीरा टाकण्याचा एक विधी आहे. ज्यामध्ये वधू अविवाहित मुलींवर कलीरा वाजवते आणि कलीरा ज्याअविवाहीत मुलीवर पडते तिचे लवकर लग्न होते असे मानले जाते. आलिया भट्टचा कलीरा करिश्मा कपूरवर पडला, ज्याची एक झलक तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.
करिश्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत. त्यात कलीरासोबतचा हा फोटो आहे. करिश्मा ही रणबीरची चुलत बहीण आहे. करिश्माने तिचा मुलगा कियानसोबत लग्नाला हजेरी लावली होती. या फोटोत करिश्मा कलिरा कॅमे-यात दाखवते. कलिरा हातात असताना तिच्या चेह-यावर असलेला आनंद त्या फोटोत दिसून येत आहे.