29.5 C
Latur
Tuesday, March 28, 2023
Homeराष्ट्रीयकर्जबुडव्यांच्या मालमत्तेची माहिती देणा-यांना बक्षीस

कर्जबुडव्यांच्या मालमत्तेची माहिती देणा-यांना बक्षीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : कर्जबुडव्यांपासून कर्जाच्या रकमेची जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी शेअर बाजार नियामक सेबीने नवीन घोषणा जाहीर केली आहे. कर्जबुडव्यांच्या संपत्तीची माहिती देणा-याला सेबीकडून २० लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. हे बक्षीस दोन टप्प्यात देण्यात येणार असल्याची माहिती सेबीने दिली. माहिती देणा-याने डिफॉल्टरच्या मालमत्तेची खरी माहिती दिली, तरच तो पुरस्कारासाठी पात्र मानला जाईल, असेही सेबीने स्पष्ट केले आहे.

कर्जबुडव्यांच्या संपत्तीची माहिती देणा-याला संपत्तीच्या मूल्याच्या अडीच टक्के किंवा पाच लाख रुपये रोख, यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येईल. तसेच कर्जाची वसुली झाल्यानंतर थकबाकीच्या १० टक्के किंवा २० लाख रुपये, जी रक्कम लहान असेल ती देण्यात येणार आहे.

सेबीने वसुली प्रक्रियेअंतर्गत डिफॉल्टर्सच्या मालमत्तेबद्दल ठोस माहिती देणा-या माहिती देणा-यांना बक्षीस देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. माहिती देणा-याने दिलेल्या मालमत्तेची माहिती दिल्यास त्याला दिलेली बक्षीस रक्कम गोपनीय ठेवली जाईल, असे सेबीने म्हटले आहे.

सेबीने जारी केली ५१५ कर्जबुडव्यांची यादी
सेबीने आज हे बक्षीस जारी केल्यानंतर ५१५ कर्जबुडव्यांची यादी जाहीर केली आहे. यापैकी कोणत्याही कर्जबुडव्याची माहिती देता येणार आहे. या बक्षीसांची रक्कमेची शिफारस करण्यासाठी सेबीकडून एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये परतावा विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक आणि संबंधित वसुली अधिकारी यांचा समावेश असणार आहे. मुख्य महाव्यवस्थापकांनी नामनिर्देशित केलेला दुसरा वसुली अधिकारी आणि इन्व्हेस्टर प्रोटेक्शन अँड एज्युकेशन फंड प्रभारी मुख्य महाव्यवस्थापकाद्वारे नामनिर्देशित अधिकारी आणि त्या कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक किंवा उच्च श्रेणीतील अधिकारी यांचाही या समितीत समावेश असणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या