परभणी : शहरातील गौरक्षण परिसरातील शुभम संजय तापडिया या १००% कर्णबधिर मूलांने प्रचंड जीद्द, चिकाटी, मेहनतीच्या बळावर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यश मिळवून जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंतापदी नोकरी मिळविली.
पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण परभणीतील अक्षरज्योती विद्यालयात झाले असून आभियांत्रिकीचे शिक्षण शासकीय आभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे झाले आहे. २०१९ ला लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकीच्या परीक्षेत त्यांच्या आरक्षित गटात त्याने पहिला क्रमांक पटाकविला. आता त्याची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंतापदी निवड झाली आहे. या पदासाठी मुख्य परीक्षा २०१९ ला दिली होती. या परिक्षेचा अंतिम निकाल १३ एप्रिल रोजी लागला असून यामध्ये शुभम संजय तापडिया हा पहिला प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाचे श्रेय तो आई व बाबांना सौ. संगिता व संजय तापडिया यांना देतो.