23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयकर्नाटकात मुसळधार, अतिवृष्टीमुळे २७ जिल्हे बाधित

कर्नाटकात मुसळधार, अतिवृष्टीमुळे २७ जिल्हे बाधित

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : गेल्या काही दिवसापासून कर्नाटकात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी बंगळुरुमध्ये पावसाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. या अतिवृष्टीमुळे २७ जिल्हे आणि १८७ गावे बाधित झाली आहेत. वाहतुकीवर परिणाम झाल्याने लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

संततधार पावसामुळ कर्नाटकात अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रामनगरासह बाधित भागाला भेट दिली. त्यांनी लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच लोकांना मदतीचे आश्वासन दिले. तसेच जूनपासून राज्यात अतिवृष्टीमुळे ७ हजार ६४७.१३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कर्नाटकचे महसूल मंत्री आर अशोक यांनी याबाबतची माहिती दिली. दरम्यान, ही पूर परिस्थिती पाहता शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली.

पावसामुळे ५.८ लाख हेक्टर
क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
पावसाच्या घटनांमुळे राज्यात एकूण २३ हजार ७९४ घरांचे नुकसान झाले आहे, तर शेती पिकांचेदेखील पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. जूनपासून आतापर्यंत पावसामुळे ५.८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती देखील देण्यात आली. या नुकसानीबाबत केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केल्याची माहिती मंत्री अशोक यांनी दिली. मात्र, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता मुख्यमंत्र्यांनी तातडीने मदत देण्याच्या सूचना दिल्या असल्याचे मंत्री अशोक म्हणाले.

रामनगरात घरांत शिरले पाणी
दरम्यान, सर्वात भीषण परिस्थिती ही कर्नाटक राज्यातील रामनगरात आहे. तिथे लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अ‍ेनक ठिकाणी रस्त्यावर उभी केलेली वाहने पाण्यात बुडाली आहेत. कर्नाटकबरोबरच केरळ आणि आंध्र प्रदेशातदेखील पाऊस आणि पुरामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या