23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रकर्मचा-यांकडून पैसे उकळल्यावरून गुन्हा

कर्मचा-यांकडून पैसे उकळल्यावरून गुन्हा

एकमत ऑनलाईन

अकोला : अकोल्यात ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह त्यांची पत्नी ऍड. जयश्री पाटील, औरंगाबादचा अजयकुमार गुजर आणि प्रफुल्ल गावंडे यांच्यावर अकोट शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर एसटी कर्मचा-यांकडून प्रत्येकी ३०० ते ४०० रुपये गोळा करून फसवणूक केल्याचा आरोप आहे.

तब्बल ७४ हजार कर्मचा-यांना फसवल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे. तसेच त्यांनी न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी पैसे गोळा केल्याचादेखील त्यांच्यावर आरोप आहे. आज या प्रकरणातील आरोपी औरंगाबादचा अजयकुमार गुजर आणि बस वाहक प्रफुल गावंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या