37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeक्राइमकल्याणमध्ये बनावट नोटांचा काळाबाजार

कल्याणमध्ये बनावट नोटांचा काळाबाजार

एकमत ऑनलाईन

मुंबई : कल्याणमधील महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या गस्ती पथकाने मंगळवारी रात्री कल्याण पश्चिमेतील एस. टी. आगार परिसरात मोठी कारवाई केली. पोलिसांनी भारतीय चलनातील २५ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. यावेळी पोलिसांनी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी आणि पत्रीपूल भागातील रहिवासी असणा-या तीन तरुणांना अटक केली.

रजनेश कुमार श्रीदुलारूचंद चौधरी (१९, रा. कोळसेवाडी), हर्षद नौशाद खान (१९, रा. पत्रीपूल) आणि अर्जुन राधेश्याम कुशवह (१९, रा. कोळसेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपी तरुणांची नावे आहेत. काही तरुण बनावट नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या