29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeमहाराष्ट्र‘कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’

‘कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो तर कसब्याचा निकाल लागतो आणि थोडं जर इकडं- तिकडं झालं तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही ठिकाणच्या मतदारांनी दिलेला धडा असून ‘कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.

कसब्याचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. २०२४ पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने एकत्रितपणे काम केले तर विधानसभेत २०० पेक्षा जास्त जागा निवडून येतील. तसेच लोकसभेला ४० जागा निवडून येतील, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

चिंचवडमध्ये आमच्याकडून काही बाबतीत चूक झाली. चिंचवडचा विजय हा भाजपचा विजय आहे, हे कोणीच मानणार नाही. चिंचवडमध्ये अनेक वर्षांपासून जगताप पॅटर्न चालतो. हा विजय जगताप पॅटर्नचा असल्याचे संजय राऊत म्हणाले. जर उमेदवार निवडताना अधिकची काळजी आम्ही घेतली असती किंवा राहुल कलाटेंनी माघार घेतली असती तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता असेही राऊत म्हणाले.
पुणेकर अभिनंदनास पात्र

या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेचे दर्शन, प्रदर्शन, विकृती पाहायला मिळाली. हे सगळं होऊन सुद्धा कसबा आणि पुण्यातील मतदारांनी सत्ताधा-यांना जी चपराक दिली, त्यातून त्यांनी धडा घ्यावा. पुणेकर अभिनंदनास पात्र आहेत. ते कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडले नाहीत. घराघरांत पैसे देण्याचे काम करण्यात आल्याचे राऊत म्हणाले. जनतेने धनशक्ती लाथाडली. कसबा ही सुरुवात आहे. ‘कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’असेही राऊत म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या