24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeक्रीडाकसोटी क्रिकेटमधून मोईन अलीची निवृत्ती

कसोटी क्रिकेटमधून मोईन अलीची निवृत्ती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: आयपीएल २०२१ च्या दुस-या पर्वामध्ये चेन्नईचा संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी असतानाच महेंद्र सिंग धोनीच्या संघातून खेळणारा एक खेळाडू निवृत्ती घेणार असल्याची माहिती समोर आलीय. सीएसकेमधून खेळणारा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो आता इंग्लंडकडून कसोटी सामने खेळणार नाही. तो लवकरच यासंदर्भातील अधिकृत घोषणा करणार आहे. आपल्या या निर्णयाबद्दल इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट, प्रशिक्षक क्रिस सिल्वरवूड आणि निवड समितीच्या अधिका-यांना मोईनने माहिती दिली आहे. मोईनने हा निर्णय मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी घेतला आहे. ३४ वर्षीय मोईन अलीने इंग्लंडसाठी ६४ कसोटी सामने खेळले आहेत.

यासंदर्भात ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार पुढील महिन्यात होणा-या टी २० विश्वचषक स्पर्धा आणि ऍशेस मालिकेमध्ये खेळणा-या इंग्लंडच्या संघामधील मोईन हा संभावित सदस्यांमध्ये आहे. या दोन्ही मालिकांमध्ये खेळण्यासाठी मोईनला घरापासून फार काळ दूर रहावे लागले असते. पण मोईन हा यासंदर्भात संदिग्धावस्थेत होता. म्हणूनच त्याने कसोटीमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे आता ऍशेससाठी त्याचा विचार केला जाणार नाही. अर्थात मोईन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यास इच्छूक आहे. तसेच तो काऊंटी आणि इतर फ्रेंचायझींसाठी क्रिकेट खेळत राहणार आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या