24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयमुसलमान देशासाठी प्राण पणाला लावतील

मुसलमान देशासाठी प्राण पणाला लावतील

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी मध्य प्रदेशमधील खरगोन शहरातील जातीय हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे, विभाजित राष्ट्र कधीही जगावर राज्य करणार नाही. मुस्लिम नेहमीप्रमाणंच देशासाठी आपले प्राण पणाला लावतील; पण जेव्हा त्यांच्या मुलांवर विनाकारण द्वेषाने हल्ला होतो, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते. राज्याने कायद्याला बगल देत मुस्लिमांची घरें उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे हे कितपत योग्य आहे? असा सवाल खुर्शीद यांनी उपस्थित केला.

मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये झालेल्या जातीय दंगलीनंतर रामनवमीच्या मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर हिंदू संघटनांसह सरकारने काही लोकांची घरे पाडली आहेत, असा दावा खुर्शीद यांनी केला. मुस्लिम नागरिकांवर हल्ले करणा-या सरकाराने हिंदू-मुस्लिम ऐक्य जपायला हवे. परंतु, हे सरकार मुस्लिमांच्या घरावर हल्ले करत आहे. हे कितपत योग्य आहे?, असा त्यांनी सवाल केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या