26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयकाँग्रेसचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे कोर्टाचे आदेश

काँग्रेसचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे कोर्टाचे आदेश

एकमत ऑनलाईन

बंगळूरू : कुठल्याही परवानगी शिवाय के. जी. एफ. २ चित्रपटातील गाण्यांचा वापर केल्या प्रकरणी बंगळुरूच्या न्यायालयाने सोमवारी काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल अकाऊंट तात्पुरते ब्लॉक करण्याचे निर्देश दिले.

काँग्रेसविरोधात एमआरटी म्युझिक कंपनीने कॉपीराइट कायद्याच्या उल्लंघनाची ही तक्रार दाखल केली आहे. कॉँग्रेसने परवानगीशिवाय या चित्रपटातील गाण्यांचे व्हिडिओ शेअर केला. त्यामुळे हा प्रकार बेकायदेशीर आणि अधिकारांची अवहेलना करणारा आहे. त्यामुळेच पायरसीला प्रोत्साहन मिळते, असे म्युझिक कंपनीचे म्हणणे आहे. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने या दोन्ही ट्विटर हँडलवरून तीन लिंक काढून टाकण्याचे निर्देश कॉँग्रेसला दिले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या