नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाची राष्ट्रीय स्तरावर कोंडी करण्यासाठी कॉँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आता अंतिम टप्प्याच्या प्रवासात पोचली आहे. ही यात्रा पूर्ण होताच कॉँग्रेस राष्ट्रीय स्तरावर २६ जानेवारी पासून दुसरे अभियान हाती घेणार आहे.
साधारण दोन महिने चालणा-या या अभियानात २६ मार्चपर्यंत घरोघरी पत्र पाठवून मतदारांना आवाहन केले जाणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जयराम रमेश यांनी कठुआ येथे पत्रकारांना ही माहिती दिली. या अभियानातून देशातील ६ लाख गावे, २.५ लाख ग्रामपंचायतींमधील १० लाख मतदान केंद्रांमध्ये कार्यकर्ते पक्षाचा संदेश घरोघरी पोहोचतील. प्रचारादरम्यान पक्ष सामान्यांशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे.