29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रकार्यक्रम रद्द करून शरद पवार दिल्लीत

कार्यक्रम रद्द करून शरद पवार दिल्लीत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलदेखील राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. शरद पवार मुंबईतील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीला गेल्याचे समजत आहे. विशेष म्हणजे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील दिल्लीत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दिल्ली दौ-यात शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. विरोधकांची बैठक असून त्यात सहभागी होण्यासाठी शरद पवार गेल्याचेही बोलले जात आहे. मात्र नेमके कारण गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत खलबते सुरू आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या