मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उशिरा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे. तत्पूर्वी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: कार चालवत राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला.