22.3 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयकाश्मिरात चकमक, चार अतिरेकी ठार

काश्मिरात चकमक, चार अतिरेकी ठार

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील जैनापोरा भागातील बडीगाममध्ये भारतीय जवान आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार अतिरेकी ठार झाले. या भागात २-३ अतिरेकी दबून बसल्याची माहिती भारतीय लष्करी जवानांना मिळाली. त्यानंतर सुरक्षा जवानांनी या भागाला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. यावेळी झालेल्या चकमकीत चार अतिरेकी ठार झाले.

दरम्यान, कनिपोरा गावानजीक सुमो वाहन पलटी झाल्याने लष्करातील २ जवान मृत्युमुखी पडले, तर ५ जण जखमी झाले आहेत. ४४ आआर चौगाम कॅम्पची ही कार होती. हे जवान सुमोमधून शोपिया चकमकीच्या स्थळी जात होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या